प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट
दी.19/01/2023 ला उपविभागीय अधिकारी यांनी अतिक्रमण संदर्भात कार्यवाही करण्याचे हिंगणघाट मुख्याधिकारी, नगर परिषद, हिंगणघाट,उपविभागीय अभियंता, सा.बां. विभाग, हिंगणघाट यांना कार्यवाही करण्यासाठी आदेश दिला त्यामध्ये संदर्भ:- 1. श्री. हरीष शंकरराव ढगे रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा यांचा अर्ज.2. मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपुर यांचे रिट याचिका क्र. 142/2022 मधील आदेश दि. 01.03.20223. शासन परिपत्रक क्रमांक: जमीन-03/2009/प्र.क्र.13/ज-1, दिनांक 7 सप्टेंबर, 2010 4. शासन परिपत्रक क्रमांक: जमीन -07/2013/प्र.क्र.374/ज-1, दिनांक 10 आक्टोबर, 2010हिंगणघाट येथील सर्वे नं 310/2/ख भूखंड क्र. 1समोरील शासकीय जमिन गट नं. 2013 व 374/3-1 वरील अतिक्रमण हटविण्याबाबत श्रीमती विद्या गजाननराव बाराहाते रा. प्रज्ञा नगर, नंदोरी रोड, हिंगणघाट यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपिठ नागपुर रिट याचीका क्र. 1422022 दखल केली असुन मा. उच्च न्यायालयाने दि. 1.03.2022 ला आदेश पारीत केले आहे.प्रस्तुत आदेशाचे अनुषंगाने दि. 26 एप्रिल, 20/2/22 रोजी मा. उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांचे अध्यक्षतेखाली सभा घेऊन, सदर सभेमध्ये मुख्याधिकारी, नगर परिषद, हिंगणघाट व उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंगणघाट यांनी संयुक्तपणे कार्यवाही करुन अतिक्रमण मोकळे करणे बाबत आदेश देण्यात आलेले होते.प्रस्तुत अतिक्रमण मोकळे करते वेळेस सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखणेसाठी पोलीस स्टेशन अधिकारी, हिंगणघाट यानी मुख्याधिकारी, नगर परिषद, हिंगणघाट व उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बाधकाम विभाग, वर्धा यांना सहकार्य करण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले होते. परंतु आज पर्यंत अतिक्रमण प्रकरणात कार्यवाही झाली नाही. तर दुसरीकडे हिंगणघाट नगरपालिके कडून राष्ट्रीय राजमार्ग हद्दीत येत असलेले अतिक्रमण विभाग प्रमुख यांनी नियमात नसताना अतिक्रमण विशेष लक्ष देऊन जबरदस्तीने काडले —- क्रमश