प्रलोभन देऊन कार्यक्रमात बोलविण्याचा फंडा बचत गटांच्या महिलांनी केला निषेध

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

दि.४ मार्च पालिकेच्या वतीने आज शहरातील विकासकामांचे भूमिपूजन व स्वर्गरथ लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते व माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.उपरोक्त कार्यक्रमासाठीबचत गटांच्या महिलांना पालिकेच्या महिला व बालविकास विभागाच्या कर्मचारी सुलभा तिमांडे यांच्याकडून उपरोक्त कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी व्हॉट्सॲप गृपच्या माध्यमातुन बचत गटच्या महिलांना आज दि.४ मार्च रोजी नगरपरिषद येथे सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले.उपस्थित राहणाऱ्या महिला सदस्यांना पालिका मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांचेकडून गिफ्ट मिळणार असल्याचे खोटे प्रलोभन देण्यात आले. एका बचत गटातुन १० महिला तर एकूण २० बचत गटाच्या २०० महिलांना नगरपरिषद येथे बोलवण्यात आले. कार्यक्रम आटोपल्यानंतर कोणतेही गिफ्ट किंवा भेटवस्तू न मिळाल्याने बचत गटाच्या महिलांनी “आमचे गिफ्ट कुठे आहे,आम्हाला दया”असा हेका धरला, आपली रोजमजूरी व कामधंदे सोडून भेटवस्तू मिळणार या भाबड्या आशेने कार्यक्रमाला आलेल्या या दोन-अडीचशे महिला संतप्त झाल्या.आमची आजची ५०० रुपये रोजी पडली,याला कोण जबाबदार ? गिफ्टसुद्धा द्यावे असा एकच नारा लावून धरला.या दरम्यान बचत गटाच्या संबंधीत कर्मचारी सुलभा तिमांडेनी तेथून पलायन केले. या सर्व गोंधळातनंतर महिलांनी प्रशासकीय अधिकारी यांच्याशी भेट घेतली, त्यांना ही सर्व माहिती व म्यॅसेज दाखविले, त्यानंतर प्रशासकीय अधिकारी यांनी या भाबड्या महिलांची दिशाभूल केल्याचे मान्य केले. बचत गटाच्या संतप्त महिलांना शांत करीत त्यांची समजूत घातली.यानंतर बचत गटाचे प्रमुख महिलांना अधिकाऱ्यांचे परवानगी शिवाय कोणतेही म्यॅसेज न टाकण्याची तंबी दिली. महिलांना भेटवस्तू चे प्रलोभन दाखवून कार्यक्रमस्थळी गर्दी जमविणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्याचा महिलांनी यावेळी निषेध करीत हा सर्व प्रकार तेथे उपस्थित पत्रकारांच्या कानी घातला असाच काहीसा प्रकार शनीवारी शहरात घडला, ऐन परीक्षेच्या हंगामात विद्यार्थी व विदयार्थ्यांना वेठीस धरून शासनाच्या पल्स- पोलिओ मोहिमेची रॅली काढून प्रचार मोहीम राबविण्यात आली, महत्वाचे म्हणजे रोटरी सारख्या समाजसेवी संस्थेचाही यात सक्रीय सहभाग होता.अलिकडे बचत गटांच्या महीलांना, विदयार्थ्यांना व शिक्षकांना वेठीस धरून अनेक कार्यक्रमांमध्ये गर्दी जमविण्याचा पायंडा पडला असल्याचे दिसुन येत असून यावर प्रशासनाने आवर घालण्याची गरज आहे.

CLICK TO SHARE