नगर पालिका अधिकारी यांनी पदाचा केला दुरुपयोग कार्यवाही नाही तर दुसरीकडे आरोपावरून 3 कर्मचारी निलंबित
प्रतिनिधी सचिन वाघे ( हिंगणघाट )
(हिंगणघाट ) संत ज्ञानेश्वर वार्ड येथील तेलंग पेट्रोल पंप जवळील असलेले श्री. साईकृपा को. ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी, हिंगणघाट येथे भूमापन क्र. ९०/१/२ मधील प्लॉट समोरील सार्वजनीक रस्त्यावर केलेले अतिक्रमण दी.6/4/2023 ला मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला नाही. अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमण काढले विक्की कोटेवार यांनी 2 दिवसांनी अतिक्रमण काढतो असे सांगितले तसे अतिक्रमण धारकांकडून नगर पालिका अधिकारी यांनी लेखी लिहून घेतले. या वेळेस अतिक्रमण काढताना जेसीबी, क्रेन, टिप्पर यांचा उपयोग करण्यात आला. नगर पालिका मुख्याधिकारी हे सांगतात अतिक्रमण धारकांनी स्वतःच अतिक्रमण काढले. अतिक्रमण विरोधात विक्की कोटेवार यांनी जिल्हाधिकारीकडे अतिक्रमण अधिकारी यांनी अतिक्रमण काडताना जेसीबी, टिप्पर, क्रेन मशीन याचा मुख्यधिकारी यांचा आदेश नव्हता हे सर्व प्लॉट मालकाने व अतिक्रमण अधिकारी यांनी मिळून जबरदस्ती धाक धापट करून अतिक्रमण काढले आहे. यांच्यामुळे प्रभागात 3 दिवस लोकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही यांनी नगर पालिका संम्पतीचे नुकसान केले त्यामुळे नुकसान भरपाई घेणे आवश्यक आहे.याकडे मुख्यधिकारी यांचे दुर्लक्ष सबंधित व्यवहाराची चौकशी करण्यात यावी असे तक्रार करतांना सांगितले.विक्की कोटेवार याचे अतिक्रमण हिंगणघाट नगर पालिकेला का काढता आले नाही?
विजय गुणवंत वंजारे यांनी नगर पालीकेत तक्रार केली त्यामध्ये सांगितले माझ्या प्लॉट समोरील सर्विस रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे तसे भूमी अभिलेख कडुन क प्रत सुद्धा दाखवली . भूमी अभिलेख यांनी केलेली मोजणी चुकीची आहे. नियमानुसार राष्ट्रीय राजमार्ग यांची हद्द 60 मीटर असते नगर रचनाकार यांनी सांगितले 100 मीटर सोडून बांधकाम करण्यात यावे. हिंगणघाट नगर पालिकेत बांधकाम ची परवानगी मिळते कशी ? त्याला लागुन सर्विस रस्ता आहे व विक्की कोटेवार याचे अतिक्रमण हे राष्ट्रीय राजमार्ग हद्दीत येत असल्यामुळे तुम्हाला अतिक्रमण काढता येत नाही. चौकशी केल्यास जागेवर सर्विस रस्त्यावर पक्के बांधकाम आहे.राष्ट्रीय राजमार्ग हद्दीत सर्विस रस्ता सांगण्यात येत आहे. भूमी अभिलेख विभागकडून क प्रत मध्ये दाखविले . या बद्दल पुरावे दिले.त्यामुळे
मुख्यधिकारी यांनी राष्ट्रीय राजमार्ग नागपूर यांना दी.29/09/2023 ला पत्र पाठविले व आपल्या हद्दीत येत असलेले विक्की कोटेवार याचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही आपल्या विभागाकडून करावी किंवा आम्हाला काढण्यास कळवावे असे सांगितले या वरून हे सिद्ध झाले की या अगोदर नगर पालिका मुख्याधिकारी यांचा अतिक्रमण काढण्याचा आदेश नव्हता व अतिक्रमण विभाग प्रमुख यांनी प्लॉट धारक याच्या सोबत व्यवहार करून जबरदस्ती ने अतिक्रमण विरोधात कार्यवाही केली. मुख्यधिकारी कडुन अतिक्रमण काढणारे अधिकारी यांच्यावर पुरावा असतानाही कार्यवाही नाही तर पालिकेतील 3 कर्मचारी यांना आरोपवरून निलंबित करण्यात येते शेवटी हेच या वरून लक्षात येते की अधिकारी पदाचा दुरुपयोग करतात इतकेच नाही तर या अगोदर नगर पालिकेकडून सरकारी रस्त्यावरील अतिक्रमण काढले परंतु त्याच ठिकाणी परत अतिक्रमण ज्यांनी तक्रार केली त्यांचे अतिक्रमण आहे. शेवटी गरीब करतात अतिक्रमण व श्रीमंत करते ते डेकोरेशन