प्रतिनिधी:साजिद खान नागपुर
वडगाव:पो स्टे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई.जिल्हाधिकारी यवतमाळ.मुख्य अभियंता परीमंडळ अमरावती अधिक्षक अभियंता,मंडळ कार्यालय, यवतमाळ.कार्यकारी अभियंता विभाग मंडळ कार्यालय, यवतमाळ.यांना उपकार्यकारी अभियंता , ग्रामीण उपविभाग यवतमाळ व .सहाय्यक अभियंता , कोळंबी. यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले, निसर्गाच्या अवली पणामुळे व पीक रोगराई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागातील जन जीवन हे अस्ताव्यस्त, व खूप त्रासदायक झाले आहेत यात शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त या काळात झाला आहे आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, परंतु या उलट ग्रामीण भागातील गावठाण फिडर व कृषी पंपाला फॉल्टी लाईन देण्यात येत आहे, ग्रामीण भागातील व शेतातील एकतर लाईन मध्ये लोड शेडिंग राहते नाहीतर फॉल्ट राहते, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील छोटे-मोठे व्यावसायिक आहे त्यांनी व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला कसे जगवावे व कसा उदरनिर्वाह करावा यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून आमच्या मागण्या आहे या मागण्यावर लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यात प्रामुख्याने . गावठाणची व शेती फिडर ची लाईन सुरळीत करणे.. शेती करिता दिवसा १२ तास लाईन देणें. . यवतमाळ ते कोळंबी उपकेंद्र लाईन सुरळीत करणे.. कोळंबी उपकेंद्रामध्ये ५ मेगा वॅट चे ३ हाय पावर ट्रान्स्फर व ३.५ मेगा वॅट चे १ हाय पावर ट्रान्स्फर आणि कूंभारी उपकेंद्रामध्ये ५ मेगा वॅट चे १ हाय पावर ट्रान्स्फर व ३.५ मेगा वॅट चे १ हाय पावर ट्रान्स्फर आहे ह्या सर्वांचे लोड जवळ जवळ ७०० ते ८०० एंपियर होते आणि कोळंबी उपकेंद्रात यवतमाळ वरून येत असलेली लाईन तार ही ४०० एंपियर पर्यंत विद्युत प्रवाह वाहू शकते परंतु आज रोजी त्या तारेवर जवळ जवळ ७०० ते ८०० एंपियर विद्युत प्रवाहा चा ताण येत आहे त्यामुळे वारंवार लाईन फॉल्टी होतं असून ब्रेक डाऊन होतों ह्यावर त्वरित उपाययोजना करणे. . सोलर फिडर असलेल्या सर्व गावांना नियमित विद्युत पुरवठा देणें.. शेती फिडर वर असलेल्या ट्रान्स्फर चे मेंटेनन्स लवकरात लवकर करणे, मेंटेनन्स करतेवेळी संबंधित शेतकऱ्यांना सूचित करणे.. शेती फिडर वरील काही भागातील डीपीवरील लोड खूप वाढलेले आहे त्यामुळे डीपी जळणे हा प्रकार वारंवार होतं असतों, ह्यावर उपाय म्हणून शेती फिडर वरील लोड लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी डीपी बदलून देणे.. डिमांड्र भरलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर विद्युत जोडणी देणें.. कूंभारी उपकेंद्रामध्ये कोळंबी येथुन दोन ते अडीच वर्षा पासून विद्युत पुरवठा सुरू आहे तो पुरवठा घाटंजी येथुन लवकरात लवकर सुरू करणे.. अकोला बाजार करिता प्रस्तावित असलेले उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करणे. कोळंबी उपकेंद्र अंतर्गत वडगाव (पो. स्टे), चौकी, झुली, वरूड, वरझडी, पिंपरी, हातगाव, कोळंबी, कारेगाव, यावाली, धानोरा, मुरझडी लाल अकोला बाजार, इत्यादी गावातील नागरिकांचा, शेतकर्यांचा व व्यावसायिकाचा विचार करून वरील मागन्या गांभीर्याने लक्षात घेऊन आपण मागण्यांची त्वरीत पूर्तता करावी, ही विनंती सदर निवेदनाद्वारे करण्यात आली जर या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असे मनसेच्या वतीने खडसावले यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रहेमान, प्रवीण बल्की, नितीन बोक्से, सदानंद कांबळे, शुभम पोटे, अशोक खडसे, प्रविन घागी, मनोज माहुरवार, निलेश हलबी, कैलास अपलवार, अक्षय येकडवार, सुरज वाघाडे, राहुल कोल्हे, विशाल घोनसेटवार, कृष्णा देठे, राजु ठक, राजु मेटकर, चंदन वानखेडे, अमित हेलुडे, रवी सातपुते, प्रशांत अहिरकर, गजानन भोयर, सुधाकर अहिरकर, विनोद घोटेकार व इतर मनसे कार्यकर्ते व शेतकरी होते