अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया) तपासणी केल्यावर लक्षात आला की गर्भाषयाचे तोंड पूर्ण उघडलेले आहे. अशा परिस्थिती मध्ये त्यांना गंगाबाई स्त्री रुग्णालयात पाठवणे धोक्याचे असल्यामुळे प्रा. आ. केंद्र मध्येच प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक बाळ डोक्याकडून होता तर दुसरा पायाडू होता.पाहिला बाळ 8:10 ला बाहेर आल्यावर दुसरा बाळ 8:51 ला जन्माला आला. दुसरा बाळ पायाळू होता आणि बाहेर येण्यास वेळ झाल्यामुळे श्वासगती बंद झाली होती परंतु त्वरित resuscitation केल्यामुळे आणि O2 दिल्यामुळे श्वासगती शुरु झाली.माता आणि दोन्ही बालक सुखरूप आहेत.सदर प्रसूती करिता पदमपुर येथील दोन्ही आरोग्य सेविका कु सलामे आणि पारधी, प्रा आ केंद्र येथील स्टाफ नर्स कु टेम्भूर्णीकर यांनी मेहनत घेतली.वैद्यकीय अधिकारी डॉ ताम्रध्वज नागपुरे यांनी जनतेला आवाहन केले की अशी धोक्याचे गर्भ असल्यावर जनतेने प्रसूती कळा शुरु झाल्याबरोबर मातांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे जेणेकरून संभावित धोके टाळता येतील. अश्या प्रसूती गंगाबाई स्त्री रुग्णालय सारख्या मोठ्या रुग्णालयात होने आवश्यक असते जेणेकरून वेळीच अत्यावश्यक सेवेची सोय करणे सोयीचे होते.
