अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)
(कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून विद्यार्थ्यांना बालवाचन वाटप)
आमगाव:मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय देणारी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविणारी व शालेय विद्यार्थ्यांच्या हीतासाठी व प्रगतीसाठी सदैव झटणारी संघटना म्हणजे कास्ट्राईब शिक्षक संघटना असे प्रतिपादन महाप्रज्ञा बौद्ध विहाराचे अध्यक्ष चंद्रकुमार मेश्राम यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटना आमगावच्या वतीने आयोजित बालवाचन साहित्य वाटप शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.यावेळी उद्घाटक म्हणुन संजय उके जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना गोंदिया व दिपप्रज्वलक म्हणुन अंकुश डोंगरे तरुण उद्योजक उपस्थित होते. कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा आमगावच्या वतीने जि.प.प्राथमिक शाळा बाम्हणी पं.स.आमगाव येथे बालवाचन साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातंर्गत पहील्या टप्प्यात अंजोरा केंद्रातील सर्व शाळेतील पहील्या वर्गाच्या मुलांचे वाचन समृद्ध व्हावे यादृष्टीने बालवाचन साहीत्य वाटप करण्यात आले.यावेळी उद्घाटक म्हणुन संजय उके जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया,अध्यक्ष म्हणुन चंद्रकुमार मेश्राम व दिपप्रज्वलक म्हणुन अंकुश डोंगरे उपस्थित होते.विशेष अतिथी म्हणुन रसिला भेदे,भरत वाघमारे,देवराज धावडे,छाया धुर्वे,राजेंद्र सांगोडे, राजेश उईके,रामचंद्र करंडे,जगन्नाथ चावके,उषा बिसेन,पल्लवी विठ्ठले,सचिन बडोले,ठाकरे ताई उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष अनिल मेश्राम यांनी केले.संचालन एम.टी.जैतवार यांनी तर आभार संदिप नंदेश्वर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा गौतम,मनिष बावणे,सुनिल बावणे,भागरता भेदे,गीता बावणे यांनी सहकार्य केले.