आशा वर्कर दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अन्य

तालुका प्रतिनिधी, विलास लभाने समुद्रपूर,गिरड,

आशा वर्कर आरोग्याचे केंद्रबिंदू असलेल्या स्वयंसेवी का म्हणून काम करीत असताना त्यांना कुठेतरी प्रोत्साहन देण्याकरिता दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले जात असते आरोग्य विभागातर्फे हा कार्यक्रम राबविल्या जाते, आरोग्य विभागाचा हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात स्वयंसेवीकांना प्रोत्साहित करण्याकरिता, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त व तालुका अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असते यामध्ये मोठ्या संख्येने आशा वर्कर गटप्रवर्तक मिळून हा कार्यक्रम आयोजित केला जात असते, कार्यक्रमाचे नियोजन अशा गटप्रवर्तक, तालुका वैद्यकीय अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थाटामाटात केला जाते, सांस्कृतिक कार्यक्रम, लावण्या,, रेकॉर्डिंग डान्स, लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची, सामान्य ज्ञान स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, एक अंकी नाटक, रंगबिरंगी वेशभूषा स्पर्धा असे सर्व कार्यक्रम तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व अशांनी सादर केले, आयोजित कार्यक्रमाकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय वर्धा व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय समुद्रपूर, व त्या अंतर्गत येणारे सर्व कर्मचारी तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आशा व गट प्रवर्धक, यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता

CLICK TO SHARE