घरात घुसून केला विवाहित महिलेचा विनयभंग

क्राइम

प्रतिनिधी सचिन वाघे

वडनेर:शेजारी राहणारी महिला फोन कॉल उचलत नसल्यामुळे आरोपी सूरज उर्फ वैभव दिनकरराव दरोडे वय 30 वर्ष महिलेच्या घरी जाऊन फिर्यादी सोबत छेडछाड करण्याची घटना तालुक्यातील वडनेर येथे दि.27.10.2023 ला सकाळी 10.30 च्या दरम्यान घडली. सदर प्रकरणी आरोपी विवाहित पीडितेने वडनेर पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात विनयभंगासह कलमासह अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी हा सदर पीडित महिलेच्या परिसरात राहणारा असून त्याने काही दिवसांपूर्वी पिडीतेकडून तिचा मोबाईल क्रमांक मिळविला परंतु तिला कॉल केल्यानंतर तिने फोन कॉल न उचलल्यामुळे चिडून जाऊन आरोपीने तिच्या घरात प्रवेश मिळविला, पिढीतेला धक्का देऊन आरोपीने सोफ्यावरती धक्का देऊन तिचा विनयभंग केला यावेळी फिर्यादीचा पती तेथे आल्याने पुढील अनर्थ टळला. पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहे.

CLICK TO SHARE