खडकी शिवारात तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू.

अन्य

नारायण उर्फ नरेंद्र मारोतराव काळे असे तरुण शेतकऱ्याचे नाव

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

जलालखेडा (त.30) नरखेड तालुक्यातील खडकी शिवारात सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने नारायण उर्फ नरेंद्र मारोतराव काळे वय वर्ष 42 रा.खडकी या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नारायण काळे हा तरुण शेतकरी सोमवारला सकाळी 8.30 च्या सुमारास शेतात गेला असता खडकी शिवारात असलेल्या वन विभागाच्या जागेत महावितरण कंपनीच्या जिवंत विद्युत तारा पडलेल्या होत्या त्याचा पाय त्या अल्युमिनियमच्या तारेवर पडला आणि तो खाली पडला असता त्याचा हात खाली पडलेल्या दुसऱ्या अल्युमिनियमच्या तारेला लागला असता त्याचा जागीच मृत्यू झाला.भाऊ शेतातून परत का आला नाही म्हणून त्याचा लहान भाऊ विनोद काळे शेताकडे गेला असता त्याला हा सर्व प्रकार दिसला. त्यांनी या घटनेची माहिती घरच्यांना व गावकऱ्यांना दिली असता गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना व महावितरण कंपनीला दिली असता ठाणेदार मनोज चौधरी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहचले व घटनेचे पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शव विच्छेदन गृह जलालखेडा येथे पाठवन्यात आला. घटनास्थळी महावितरण कंपनीचे अधिकारी यांनी सुध्दा घटनेची पाहणी केली.चरणसिंग ठाकूर हे सुद्धा घटनस्थळी पोहचले व घटनेची पाहणी करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत लवकरच मिळणार असल्याचे सांगितले.माजी सभापती संदीप सरोदे, तालुका अध्यक्ष दीलेश ठाकरे,दीपक कडूकर,अरविंद ढोरे यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली.या पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कबूल केले तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा सुध्दा दिला जाणार असल्याचे सांगितले.या घटनेचा तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज शेंडे व प्रकाश ठोके करीत आहे.

CLICK TO SHARE