शेती समस्या सोडविण्याची 4000 पेक्षा जास्त गटांची तयारी.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थीती.
शेतकऱ्यांचा केला सत्कार.
प्रतिनिधी:साजिद खान नागपुर
जलालखेडा (त.31) नरखेड तालुक्यातील उमठा येथे एकदिवसीय शेतकरी पुत्र संस्कार शिबिर संपन्न झाले. शिबिराचे आयोजन पानी फाउंडेशन व शेतकरी पुत्र कापूस उत्पादक गट उमठा यांनी केले. यात समृध्द गाव स्पर्धा ज्यामध्ये एसओपी आधारित गट शेती करून शेतीत निरंतर येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील 39 तालुक्यातील 4000 पेक्षा जास्त गटांनी तयारी दर्शवली आहे. यात नरखेड तालुक्याचा ही समावेश आहे. शेतकरी पुत्र कापूस उत्पादक गट उमठा हा त्यातीलच सहभागी गट असून गेल्या वर्षीपासून या गटातील बारा सदस्यांनी आपल्या शेतामध्ये एसओपी आधारित शेती केली. त्यांनी तो अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, शेतकऱ्यामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा या हेतूने एकदिवसीय शेतकरी पुत्र संस्कार शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये नरखेड, काटोल, आर्वी, वरुड आणि चिखलदरा येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शिबिरामध्ये विविध विषय निहाय चर्चा असल्याने विविध विषयाचे अभ्यासक यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलें. ज्यामधे उद्यांपंडित पुरस्कार प्राप्त मनोज जवंजाळ, पानी फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक भूषण कडू , तालुका समन्वय राम अंभुरे, शिवहरी टेके, जयकुमार सोनुले, तथा खरांगणा तालूका आर्वी. च्या सरपंच नीलिमा अकलवार आदींनी आपापल्या विषयाची मांडणी केली. सध्या पाणी फाउंडेशन फळबाग, पशू संवर्धन व रब्बी पिकांच्या शेतीशाळा घेऊन येत आहे. आर्वी, वरुड, नरखेड आणि चिखलदरा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बीसाठी आपले किमान 11 सदस्याचे गट तयार करून पाणी फाउंडेशन टीमची संपर्क करावा. असे आवाहन पाणी फाउंडेशन चे विदर्भ समन्वयक भूषण कडू यांनी केले. या कार्यक्रमाला चरणसिंग ठाकूर सभापतीकृषी उत्पन्न बजार समिती,काटोल. नरेश अरसडे, राजेंद्र हरणे, जिल्हा परिषद सदस्य प्रितम कवरे , कुलदीप हिवरकर, दिनकर राऊत, दीपक पोतदार, उकेश चव्हाण, दीलेश ठाकरे, डॉ.भास्करराव विघे, गोपाल ठाकरे, प्रकाश घोरपडे, केशवराव पोटपिटे, कुलदीप हिवरकर यावेळी उपस्थित होते. शिबिराचे संचालन प्रवीण पोटपिटे, तृप्ती पोटपिटे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी ठाकरे हिने केले. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी गटातील सदस्य अमित थेटे, राजकुमार चौधरी, धनंजय पोटपिटे, श्रीधर सलाम, प्रदीप कोहडे, गौरव ठाकरे, रमेश ठाकरे, लक्ष्मण येडमे, राहुल निंबुरकर किसनाजी चौधरी तसेच सर्व ग्रामस्थ उमठा व स्वयंसहायता बचत गटातील महिला भगिनींनी परिश्रम घेतले.फोटो ओळी. शेतकरी महिलेचा सत्कार करताना मान्यवर. यांचा केला सत्कार. यावेळी मनोज जवंजाळ( काटोल), चंद्रशेखर पाटणकर (वरूड) नीलिमा अकलवार (आर्वी) पपीता सहारे (नरखेड) या प्रगतशील शेतकर्याना भूमिपुत्र शेतकरी पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सुनील मोहोड,संजय वाळके,अनिल ढोके यांचा सत्कार करण्यात आला.