१८ व्या राष्ट्रीय आष्टेडू आखाडा स्पर्धेत वरो-याच्या फौजी वाॕरिअर्स विद्यार्थ्यांची दणदणीत कामगिरी

खेल

८ सुवर्ण व १ कास्य पदक पटकाविले

वरोरा/ब्युरो

वरोरा:आष्टेडू मर्दानी आखाडा फेडरेशन आॕफ इंडीया अंतर्गत महाराष्ट्र आष्टेडू मैदानी आखाडा असासिएशन व सातारा जिल्हा आष्टेडू मैदानी आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा २०२३ आष्टेडू आखाडा स्पर्धेचे दि. २८ व २९ आॕक्टोबरला श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा संकूल , सातारा येथे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत केरळ , तामिळनाडू , कर्नाटक , तेलंगाना , महाराष्ट्र , राजस्थान , जम्मू , हरियाणा या राज्यातील जवळपास १००० ते १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत वरो-याच्या फौजी वाॕरिअर्स च्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील सगळ्यात जास्त सुवर्ण पदक मिळवून देण्यात यश संपादन केलेले आहे . तब्बल आठ सुवर्ण तर एक कास्य अशा एकूण ९ पदकांची कमाई करीत वरो-याच्या विद्यार्थ्यांनी केवळ वरो-याचेच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात चमकविले आहे . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे १६ वे वंशज , सातारा विधानसभा क्षेत्राचे आमदार शिवेंद्रराजे भोसले प्रामुख्याने उपस्थित होते . १२ , १४ , १७ व १९ या वयोगटात रितिक धवणे , वेदांत अटकाळे , पियुष विंधाने , यश नरडे , सोनू निकोडे , सानिया आवारी , पद्मश्री झुरडे , वेदीका भोयर यांनी सुवर्ण तर शोन दसुडे याने कास्य पदक पटकाविले आहे . फौजी वाॕरिअर्स मार्शल आर्टस वरोरा चे विद्यार्थी सातत्याने वरो-याचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही मोठं करित आहेत . हादभावना चौकातील इंदीरा गाःधी शाळेच्या आवारात हे सर्व विद्यार्थी गुरु राजू नकवे , प्रविण चिमूरकर , डी एन खापने , रवी चरुरकर , रविंद्र तुरानकर व अश्विनी नरड यांच्या मार्गदर्शनात कसून सराव करतात . या सर्व विद्यार्थ्यांवर वरोरावासियांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे .

CLICK TO SHARE