अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया)
स्थानिक एस. चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना, आय. क्यू. ए. सी. विभाग विभागाद्वारे ३१ आक्टोबर रोजी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अविनाश तितरमारे तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्रमोद सरदार, प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष थूल , आय. क्यू. ए. सी. विभागप्रमुख प्रा. स्वप्नील भगत,प्रा. दीक्षा बडोले उपस्थित होते.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अविनाश तितरमारे यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थिताना समोर लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्रमोद सरदार यांनी अखंड भारत व राष्ट्रीय एकात्मता विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष थूल यांनी केले त्यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करत लोहपुरूष वल्लभभाई पटेल याच्या कार्याचे महत्व समजावून सांगितले.तसेच या कार्यक्रमात विद्यार्थीनीना राष्ट्रीय एकात्मतेची शपत देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन कु. नलिनी ठाकरे तर आभार प्रदर्शन कु. पायाल पुंडे यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ. ललितकुमार ठाकूर, डॉ. देवानंद खोब्रागडे, डॉ.चंदा गावंडे, , डॉ. अजय मून प्रा. कमलेश पाटील, प्रा.सौरभ बागडे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी जयेश सहारे,राजेश हातझाडे, थानसीग ठाकूर, हेमकृष्ण काठाने, मंगल गोंडाणे, अमर गोडसे, वर्षा वांडरे,निर्दोष सहारे, विनोद डोंगरवार व विद्यार्थीनी मोठ्या संखेत उपस्थित होत्या.