सिरूड – वनी रस्त्यावर जरा जपुन चला

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर ते लहान वणी दहा किलोमिटर अंतरावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे . या मार्गावर रोज अपघाताची मालिका सुरु आहे रस्त्यावर प्रवास जीवघेणा झाला आहे .याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . गेल्या अनेक वर्षापूर्वी हया रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलें नाहीं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामीण भागातील रस्त्यावरील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असते.या विभागानेसुद्धा दुर्लक्ष केल्याने मार्गाची चाळण झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा विस्वास संपादन करण्यासाठी रस्त्याची डागडुजी केली जाते. मात्र अल्पावधीतच मार्गाची स्थिती जैसे थे होत असल्याचे आतापर्यंत पहायला मिळाले आहे. लोकप्रतिनिधी या भागात फिरकत नसल्याने विकास कागदावर होत असल्याचे चित्र आहे.

CLICK TO SHARE