तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिस मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ. समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. आज हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी विधानसभा क्षेत्रातील चिंचोली येथील भटके विमुक्त आघाडी च्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला या वेळी अनेकांनी प्रवेश केला.