कृषी विभागाने केले सहकार्य,प्रगतीशील शेतकरी सचिन केने यांनी घेतला पुढाकार.
प्रतिनिधी:साजिद खान नागपुर
जलालखेडा (त.2) नरखेड तालुक्यातील खापरी केने येथील प्रगतशील शेतकरी सचिन केने यांच्या पुढाकाराने शेतकरी व कृषी विभागाच्या सहकार्याने व श्रमदानातून खापरी केणे येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या बंधाऱ्याच्या फायदा होणार असून रब्बी क्षेत्रात वाढ करणे हा या मागचा उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांना मोहरी,जवस, करडई सारखे तेलवर्गीय पिके घेणेबाबत कृषी विभाग मार्फत मार्गदर्शन केले जात आहे. लोकसहभागातून श्राम्दानाद्वारे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी तालुका कृषि अधिकारी कुणाल ठाकूर, कृषि पर्यवेक्षक मुंगभाते, अमित वानखेडे,कृषि सहायक रुपेश निमजे, प्रगतीशील शेतकरी सचिन केणे व ईतर ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.