प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट समुद्रपुर
सिंदी (रेल्वे) मतदार संघात भारत निवडणुक आयोगाने 1 जानेवारी 2024 पासुन छायाचित्र मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आहे. सदर कार्यक्रमानुसार दि. 27 ऑक्टोबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली प्रारूप यादी नुसार हिंगणघाट मतदार संघामध्ये एकुण 336 मतदार केंद्र मिळुन महिला- 150805 असे एकुण 292079 मतदार आहेत. दि. 27 ऑक्टोबर ते 09 डिसेंबर पर्यत दावे, हरकती सदर स्वीकारण्याचा कालावधी राहणार आहे. तसेच दि. 04 व 05 नोव्हेंबर व 25 व 26 नोव्हेंबर 2023 रोजी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणी करिता विशेष शिबीर राबविण्यात येणार आहे. दि. 26 डिसेंबर 141274 व पुरुष पर्यत दावे हरकती निकालात काढुन 5 जानेवारी 2024 रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. या प्रमाणे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुक-2024 यादीमध्ये नाव नोंदविण्याची हिशेवटची संधी आहे. यासाठी 18 वर्ष पुर्ण झालेल्या किंवा 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पुर्ण होणाऱ्या सर्व मतदार युवक व युवतींनी टिसी, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, कुटुंबातील एका व्यक्तीचे मतदान ओळखपत्र, रहिवासी पुरावा, इत्यादी पुरावे जोडुन नमुना 6 चा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरुन बिएलओ कडे किंवा सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयात सादर करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले तसेच सहा.मतदार नोंदणी अधिकारी श्री. सतिश मासाळ यांनी केले आहे.