तालुका प्रतिनिधी — पवन ढोके वरोरा
भद्रावती तालुक्यातील कचराळा येथील सुरेश ईश्वर कलारे यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. परंतु प्रकृती खुपच खराब असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. कचराळा येथील श्री जगन्नाथ पायताळे यांनी 75-वरोर-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांना फोनव्दारे वाहनाची व्यवस्थेकरीता विनंती केली असता वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता भद्रावती तालुक्यात कार्यरत पक्षाचे “शिवनेरी” वाहन भद्रावती ग्रामीण रुग्णालय येते वैदकिय उपचाराकरिता पाठवून रुग्णास शासकिय रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वेळीच केलेल्या सहकार्यामुळे रुग्णास तात्काळ उपचार प्राप्त झाले तसचे आता प्रकृती स्थीर असून सुधारणा होत आहे. तरी जनतेला आव्हान करण्यात येते संकट कालीन काळात व आपल्या सेवेसाठी वरोरा -भद्रावती विधानसभेत वरोरा तालुका येते “शिवालय” व भद्रावती तालुक्यात “शिवनेरी” अशी शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची वाहने २४ तास जनसेवेत ठेवली आहे.करीता जनतेचे माहीतीस सादर.