मालगाडी चे दोन डब्बे घसरले : मोठा अपघात टळला

टेक्नॉलॉजी

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

दिनांक. ०६/०६/ २०२४ बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे आज सकाळी मालगाडी रेल्वे चे दोन डब्बे रुळावरून घसरले.माहितनुसार, आज सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास बल्लारपूर यार्ड मध्ये मालगाडी चे दोन डब्बे रुळावरून खाली घसरले. लोह खनिज भरून असलेली मालगाडी सेटिंग करून एम फोर लाईन वर घेत असताना डब्बे घसरले आहे, अशी माहिती मिळाली.या अगोदर सुद्धा दोन डब्बे घसरल्याची घटना बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे घडली होती. सदर घटनेला स्टेशन मास्तर रवींद्र नंदनवार, आरपीएफ सुनील पाठक तसेच रेल्वे चे आधिकरी यांनी भेट दिली.

CLICK TO SHARE