जिल्हा परिषद कृषी सभापती प्रवीण जोध यांनी दारू पेऊन बिजेपि च्या कार्यकर्त्याला केली मारहाण.

क्राइम

लोहारा येथील घटना अनिल शालिकराम काटोले असे जखमी चे नाव

प्रवीण उर्फ बालू जोध यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल.

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

जलालखेडा (त.7) सोमवारी नरखेड तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे निर्णय जाहीर झाले. यात भाजपचा मोठ्या प्रमाणात विजय झाला असल्यामुळे अनिल देशमुख यांना मोठा झटला लागला. अनिल देशमुख गटाचे जिल्हा परिषद कृषी सभापती प्रवीण उर्फ बालू जोध यांनी लोहार येथील युवक अनिल शालिकराम काटोले वय वर्ष 43 रा. लोहारा याला मारहाण केल्या प्रकरणी प्रवीण जोध यांच्या विरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री 7 च्या सुमारास अनिल काटोले आपल्या वडील सोबत स्वतःच्या कपड्याच्या दुकानात बसले होते. त्या वेळेस प्रवीण जोध तिथे आले व गाडीतून उतरून शिवीगाळ करायला सुरवात केली, तसेच अनिल काटोले यांच्या दुकानाच्या आत शिरून जोड्यानी मारहाण केली तसेच अनिल चे वडील व पुतण्याला सुध्दा धमकावले व आईला शिवीगाळ केली. तीन दिवसापूर्वी प्रवीण जोध यांनी अनिल काटोले याना जिवे मारण्याची धमकी सुध्दा दिली होती. घटनेची माहिती मिळताच लोहारा येथील नागरिक संतप्त झाले व त्यांनी रात्रीच्या वेळेस जलालखेडा पोलिस स्टेशनला घेराव घातला. पोलिस स्टेशन समोर काही काळ तनापूर्न वातावरण निर्माण झाले होते. लोहारा येथे बिजेपी पक्षाची सत्ता आल्यामुळे राजकीय वादातून ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे. सोमवारी रात्री प्रवीण उर्फ बालू जोध यांच्या विरुद्ध कलम 452, 294, 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस स्टेशन समोर नागरिकांची जमलेली गर्दी.

CLICK TO SHARE