प्री-प्रेड विज मीटर लावणे बंद करा,शहर विकास आघाडीचा आंदोलन इशारा

टेक्नॉलॉजी

वीजग्राहकांना त्रासदायक बिल वाटणारे,वाटणारे,रीडिंग घेणारे होणार बेरोजगार ‌‌

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : वीज सामान्य नागरिकांची प्राथमिक गरज असून सरकारने माफक दराने वीज पुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणामुळे वीज ग्राहकांचे जगणे कठीण झाले आहे. अशावेळी महावितरणद्वारा प्री-पेड स्मार्ट मीटर लावणे सुरू केले आहे. यामुळे वीज ग्राहकांसह बिल वितरण, वीज रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे हे वीज मीटर लावू नये, अशी मागणी शहर विकास आघाडीच्या वतीने महावितरणला शुक्रवारी निवेदनातून केली आहे.वीज वितरण कंपनीतर्फे बल्लारपूर शहरातील ३२ हजार ९०० वीज ग्राहकांचे चालू असलेले वीज मीटर बदलून त्याऐवजी नवीन प्री-पेड मीटर लावण्याचा उपक्रम प्रारंभ केला आहे.यामुळे अनेक गोरगरीब विज ग्राहकांचे बेहाल होणार आहे.तसेच या मिटरमुळे मीटर रीडिंग करणारे,बिल वितरीत करणारे कामगार सेवेतुन कमी होउन बेरोजगार होणार आहेत.त्यामुळे मीटर लावणे बंद करावे, अन्यथा २० जुन ला वीजवितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत थुलकर यांच्या नेतृत्वात महावितरणचे सहायक अभियंता मसादे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.यावेळी अरुण लोखंडे, ईश्वर देशभ्रतार, माजी नगरसेवक सरफराज शेख, अवतार सिंह दिगवा, आंबेडकर मुन, शंकर वनकर, अशोक भावे, ताराचंद रायपूरे , भाऊराव सोनटक्के, रमेश अंगुरी, सुभाष तंगडपल्लीवार सह आदी उपस्थित होते.

CLICK TO SHARE