एका युवकाने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : एका युवकाने वर्धा नदीच्या सास्ती पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. राजुरा तालुक्यातील सास्ती येथील ३२ वर्षीय युवक रोहन संतोष चिंताला याने काल सायंकाळी सास्ती पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीस आले. काल सायंकाळी ७ वाजता सास्ती पुलावर ये जा करणाऱ्यांना त्याची दुचाकी आणि चपल दिसली. त्या लोकांनी त्याच्या घरच्या लोकांना माहिती दिली. माहिती मिळताच घरच्यांनी सास्ती पुलावर येऊन रोहन चा शोध घेतला. तसेच त्याची माहिती बल्लारपूर पोलीस स्टेशन ला दिली. घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्याचे शव मिळाले काल त्याला चंद्रपूर येथे दवाखान्यात उपचार करुन ४ वाजता घरी आले होते. पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.पुढील तपास बल्लारपूर पोलिस निरीक्षक आसिफराजा बी. शेख‌ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रेमशाहा सोयाम, पोलिस शिपाई हेमराज गुरुनुले करीत आहे.

CLICK TO SHARE