आज खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

चुनाव

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : चंद्रपूरवणी आर्णी लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा बाळू धानोरकर यांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोषात गौरव करण्याच्या हेतूने ११ जून २०२४ ला मंगळवार सायंकाळी ७ वाजता गांधी चौक, बल्लारपूर येथे धानोरकर यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांच्या अध्यक्ष मध्ये डेपो हनुमान मंदिर सब्जी मार्केट जुना बस स्टँड येथून सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.यानिमित्ताने होणाऱ्या भव्य मिरवणूक आणि सत्कार सोहळ्याला काँग्रेस आणि इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन च्या वतीने करण्यात येत आहे.

CLICK TO SHARE