उन्हामध्ये महिलांची पाण्यासाठी भटक
तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर
कडक उन्हाची दाहकतासध्या सगळीकडेच जाणवत आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये आठ दिवसापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशातच ग्रामीण भागातील जनतेला पाणीटंचाईच्या भीषण वास्तवाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळाच्या झळा जाणवत असताना गावातील महिलांना पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.सध्या नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत आहे. त्यात पाणी संकट निर्माण झाले आहे. तातडीने पाण्याची समस्या निकाली काढण्यात यावी अशी मागणी महीला व ग्रामस्थांनी केली आहे