घरफोडी करणाऱ्या दोन आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर :बल्लारपूर येथील विद्यानगर वॉर्ड मध्ये राहणारा राजू महादेव पिंपळकर आपल्या परिवारा ला घेऊन देव दर्शनाला गेले असता घरी किनीही नाही पाहून अज्ञात चोरट्यानी घरातील दरवाज्याला लागलेला कुलूप तोडून घरात प्रवेश करून आलमारीतील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिनेची चोरी केली. चोरीची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली. तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षण असिफ राजा बी, शेख यांनी आपल्या पोलीस चमू ला आदेश देऊन लवकरात लवकर तपास करून आरोपी ला अटक करावे.पोलीस टीम ने लवकर च तीन आरोपी 1)किशोर श्यामराव त्रिसूलवार (28)रा, डॉ, राजेंद्र प्रसाद वॉर्ड (2)तिरुपती उर्फ लाड्या अशोक दसरवार (20)रा, गौरक्षण वॉर्ड (3)रितिक विठ्ठल उपरे (24)डॉ, राजेंद्र प्रसाद वॉर्ड.यांना अटक करून त्यांचा जवळून एक मोटारसायकल, सोन्या चांदीचे दागिने असे मिळून 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघड करून कारवाई करण्यात आली.सदर कारवाई ठाणेदार असिफ राजा बी, शेख यांचा मार्गदर्शन मध्ये गुन्हे शाखा पथकातील गजानन डोईफोडे, सुनील कामटकर, संतोष दंडेवार, रणवीजय ठाकूर पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके इ,गुन्हे शाखा टीम ने केली.

CLICK TO SHARE