प्रतिनिधि : अरबाज पठाण ( वर्धा )
AIMIM वर्धा शहर अध्यक्ष तथा जिला प्रभारी आसिफ खान यांनी वर्धा नगर पालिकेला वर्धा शहरातील प्रभाग क्र. 18, पाकीजा कॉलनी, जाकीर हुसैन कॉलनी येथील प्रलंबित असलेलं रोड आणि नाल्यांचे बांधकाम पूर्णत्वास न्यावे, याची निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती, सदर मागणीचा पाठपुरावा आसिफ खान यांच्या वतीने नगर पालिका प्रशासन यांच्या अधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या मध्यामतून करत आले. पण यांच्या मागणीच्या बाबतीत नगर पालिका प्रशासनद्वारे उदासीन भुमिका घेत असल्याचे निदर्शनास येत असल्याच्या कारणाने, प्रभागातील जनतेला न्याय मिळवुन देण्याच्या अनुषंगाने आसिफ खान यांनी नगर पालिका प्रशासनास येत्या 15 दिवसात या मागणीची पूर्तता केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार किंवा घटना घडल्यास याला सर्वस्वी नगर पालिका प्रशासन आणि अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा सुधा आसिफ खान यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. नगर पालिका प्रशासन या वर काय तोडगा काढते आणि मागणीची पूर्तता कशी करते हा चिंतनाचा विषय आहे.