जयभारत टेक्स्टाईल च्या उदासीन धोरणामुळे दोनशे कर्मचाऱ्यांनवर आली उपासमारीची पाळी

बिज़नेस

भीम आर्मी कडून जयभारत टेक्स्टाईल ला 7 दिवसाचा अवधी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

एकेकाळी नावाजलेला पुलगाव कॉटन मिल ठरतोय मजुरांच्या पोटाचा प्रश्न

प्रतिनिधि : अरबाज पठाण ( पुलगांव )

पुलगाव :- जयभारत टेक्स्टाईल कॉटन मिलने वर्करला न सांगता 17/5/24 पासून तीन दिवसात कॉटन उपलब्ध करतो असे सांगून तब्बल एक ते दीड महिन्यापासून वर्करला बसवले घरी बसविले आहे. त्यामुळे मजुरांची दैनंदिन जीवनाचे रोजगार नसल्यामुळे जगण्या मारण्याची पाळी त्या दोनसे मजुरांवर निर्माण झाली आहे .भीम आर्मी कार्यालयास कॉटन मिलच्या मजुरांनी तक्रार करताच भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे व त्यांची टीम आज दिनांक 12/ 6/ 24 ला पुलगाव कॉटन मिल येथे जाऊन तेथील जीएम श्री शेख आणि कॉटन मिलचे संचालक प्रवीण कृष्ण तायल यांच्याशी फोन द्वारा चर्चा केली केली असता मजदूराला न सांगता खोटे बोलून कॉटन मिल ला बंद करण्यात आले सुमारे दीडशे ते 200 वर्कर आज घरी बसलेले आहे त्यांची पैशाच्या अभावी जीवी मारण्याची पाळी आली असून लेकराचे शिक्षण दैनंदिन जीवनातील समस्या यांना तोंड देणे अवघड झाले आहे याकरिता भीम आर्मी द्वारा कॉटन मिल पुलगावला सात ते आठ दिवसाचा अवधी देण्यात आला सात ते आठ दिवसात कॉटन उपलब्ध करून मजुरांना कामावर घ्या अन्यथा त्यांचा पगारातून मजुरांची आर्थिक दृष्टी पाहून दैनंदिन जीवनासाठी अर्धा पगार त्यांना देण्यात यावा संविधानिक कायदा अंतर्गत कामगारांना बेवारस सोडून चालणार नाही कॉटन मिलच्या मालकाची हुकूमशाही पुलगावकर आणि भीम आर्मी खपवून घेणार नाही याकरिता कॉटन मिलच्या मॅनेजमेंट कडून लेटर सुद्धा लिखित घेण्यात आले मिल बंद असल्याने मजुरांना जीवितहानी झाल्यास कॉटन मिलचे मॅनेजमेंट आणि संचालक हे सरासर जबाबदार राहणार याची दक्षता कॉटन मिलने घ्यावी लवकरात लवकर सिक्सटी कॉटन उपलब्ध करून मजुरांना कामावर घेण्यात यावा अन्यथा भीम आर्मी विदर्भप्रमुख अंकुश कोचे संविधानिक मार्गाने लढून तीव्र आंदोलन करणार चेतावणी देण्यात आली त्यावेळेस उपस्थित जीएम शेख आणि मजदूर वर्ग भीम आर्मी टीम होते.

CLICK TO SHARE