भारसींगी गट ग्राम पंचायतीवर भाजप, राष्ट्रवादीची एक हाती सत्ता

चुनाव

प्रगती ग्रामविकास विकास पॅनलचे सरपंच सह 6 सदस्य आले निवडून

प्रतिनिधी:विजय बागडे जामगाव (बु.)

भारसिंगी:(त.8) नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमध्ये बिजेपीने बाजी मारली असून भारसिंगी येथे केने विरुद्ध पोटोडे अशी लढाई पाहायला मिळाली असून या आधी ग्राम पंचायतीवर पोटोडे यांची सत्ता होती. परंतु जनतेने विद्यमान पार्टीला नाकारले असून केने यांच्या हाती एक हाती सत्ता दिली असून सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव होते. यात प्रगती ग्रामविकास पॅनलच्या शारदा रवींद्र धवराळ यांनी 572 मत मिळवत दनदनित विजय मिळवला आहे. यात केने गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले . यात केने गटाकडून अशोक केने २२२ मते, चंद्रभान रोकडे १४१, अक्षय रामदास इरखडे १४३ मते, योगिता विलास गेडाम १३३ मते, किरण महेन्द्र तांडेकर २१७ मते, कल्पना छत्रपती ढोपरे १३० मते मिळवत विजय मिळवला आहे. अशाप्रकारे प्रगती ग्रामविकास पॅनेल ने 7 विरुद्ध 1 अशी सत्ता स्थापन केलेली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत दनदनित विजय मिळवल्या नंतर आनंद साजरा करताना नवं निर्वाचित सरपंच व सदस्य गण व गावकरी.

CLICK TO SHARE