जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर मो.88068 93813
चंद्रपूर : मागील वर्षी चंद्रपूरशहरात पहिल्याच पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. वडगाव प्रभागातील नानाजी नगर, दत्तनगर, मित्र नगर, बापट नगर, स्नेह नगर, भावनाथ सोसायटी, अपेक्षा नगर, ओम भवन इत्यादी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. संपुर्ण शहरात कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती पहिल्या पावसाने निर्माण केली होती. मुळात पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई करणे, नाल्यांमध्ये साचलेला कचरा काढून नाल्यांचे प्रवाह मोकळे करणे अशी स्वच्छतेची महत्त्वपूर्ण कामे मागील वर्षी मनपाने केले नाही. मनपाच्या या चुकीमुळे कृत्रिम पुराचा फटका शहरातील नागरिकांना बसला, हजारो नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असा आरोप मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.यावर्षी सुद्धा संपूर्ण शहरातील नाल्यांमध्ये कचरा साचलेला आहे. नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिली. या बाबत तातडीने उचित कार्यवाही करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने लेखी पत्र देऊन उचित कार्यवाही करण्याची मागणी केली. या वेळी शिष्टमंडळामध्ये जनविकास सेनेचे सुभाष पाचभाई, मनिषा बोबडे, अक्षय येरगुडे, अमोल घोडमारे, स्नेहल चौथाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.