प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली
वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2023-24 चा 43 वा “ बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पुजन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली व आ.चंद्रकांत नवघरे यांच्या उपस्थितीत आणि डॉ.सुनिलराव कदम, उपाध्यक्ष , डॉ. शिलाताई कदम, बालासाहेब बारहाते, सौ.मिराताई बारहाते , श्रीधर पारवे, सौ.गंगासागरताई पारवे या उभयंतांचे हस्ते संपन्न झाला आहे.कारखान्याचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगांवकर यांनी मार्गदर्शन करतांना कारखाना कारखान्याचे सभासदांनी आपला ऊस आपल्याच पुर्णा कारखान्याला द्यावा असे आवाहन यावेळी केले. तसेच कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील ऊस सुध्दा कारखाना गाळपास स्विकारणार व कारखाना सभासदांप्रमाणेच ऊस दर देणार असल्याचे सांगितले. यावेळी आ.राजुभैय्या नवघरे, कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.सुनिलराव कदम, शेती व ऊसविकास उपसमिती अध्यक्ष शहाजीराव देसाई,कारखान्याचे संचालक बालासाहेब बारहाते या सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणात सर्व सभासदांना आपला ऊस आपल्याच पुर्णा कारखान्याला द्यावा अशी विनंती केली. सदर कार्यक्रमास माजी आमदार पंडीतराव देशमुख, रामचंद्र बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, परभणी जि.म.बँकेचे तज्ञ संचालक आंबादासराव भोसले, कारखान्याचे सर्व संचालक, परिसरातील सभासद, शेतकरी बंधु, तोड / वाहतुक ठेकेदार, कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी कारखान्याचे संचालक प्रल्हादराव काळे यांनी आभार प्रदर्शन केले.