निशुल्क आरोग्य तपासणी व बीपी शुगर (मधुमेह) ईसीजी आणि हाडांचे कॅल्शियम तपासणी शिबिराचे आयोजन

टेक्नॉलॉजी

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

नागपुर:नागपूर महानगर पालिका व बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित स्व.अनुसयाबाई काळे महिला समुपदेशन केंद्र लक्ष्मीनगर झोन क्र.१ व सर गंगाधर चिटणीस ट्रस्ट संचालित केअर हॉस्पिटल द्वारे निशुल्क आरोग्य तपासणी व बीपी शुगर (मधुमेह ) ईसीजी आणि हाडांचे कॅल्शियम तपासणी शिबिराचे आयोजन प्रज्ञा शील करुणा बुद्ध विहार कामगार कॉलनी सुभाष नगर नागपूर येथे करण्यात आले होते या शिबिराचा परिसरातील ८० महिला व पुरुषांनी लाभ घेतला . या शिबिराला मुख्य डॉ. शिशुपाल ठाकूर व त्यांच्या सर्व टीम मेंबर मितु धुल, नलिनी प्रसाद, मानसी रामटेके, हर्षिता व केअर रुग्णालायचे समन्वयक अब्दुल सलाम, व ट्रस्ट समन्वयक शर्वरी भुसारी तसेच स्व.अनुसयाबाई काळे महिला समुपदेशन केंद्र लक्ष्मीनगर झोनच्या समुपदेशिका सौ.मोनाली तांदुळकर,सौ.मनीषा सूर्यवंशी ( लहासे ) सौ.माधुरी इंगोले,देविशा दहिकर व हर्षल पाटील यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

CLICK TO SHARE