बल्लारपूर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी,पोलिसांचे चोख बंदोबस्त

धर्म

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : शहरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आले.ईद हा मुस्लिम बांधवांचा फार मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण मुस्लिम बांधव मोठ्या आनंद उत्साहाने व थाटामाटात साजरा करतात. बकरी ईद या सणाला ईद- उल- जुहा असे ही म्हणतात. हा उत्सव कुर्बानीशी संबंधित आहे. ईद-उल- जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाची आठवण म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे प्रतिक म्हणून बक-याची कुर्बानी दिली जाते. शहरातील तीन ईदगाह तसेच विसापुर, बामणी येथील ईदगाह वर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली व एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिले.बकरी ईद निमित्य अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी इंतजामिया कब्रस्तान कारवा रोड बल्लारपूर येथील तात्पुरत्या स्वरूपात उघडलेल्या कत्तलखान्यास भेट दिली.दरम्यान नगरपरिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ तसेच राजुरा व बल्लारपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जुमडे हजर होते.सदर ठिकाणी योग्य पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते.शहरात तसेच बल्लारपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बामणी तसेच विसापूर येथे ईद निमित्य पोलिस निरीक्षक आसिफराजा बी शेख यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवला होता.

CLICK TO SHARE