थोरला मठ वसमत येथे पुण्यतिथी सोहळा अनेक गुरुवर्यांची उपस्थितीत संपन्न झाला

धर्म

प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली

वसमत : येथे प्राचीन थोरला मठ येथे श्री ष .ब्र. १०८ सांब शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने श्री ष.ब्र. १०८ सांबा शिवाचार्य महाराज व श्री ष वेदांताचार्य ष ब्र . १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य नेतृत्वाखाली वउपस्थित गुरुवर्यांच्या सानिध्यात लि .आचार्य ष .ब्र.१०८ दिगंबर शिवाचार्य महाराज पुण्यतिथी सोहळा विधी पूर्ण मोठ्या उत्साहात आनंदमय वातावर्णत महाआरती करून थोरला मठ येथून शहरातील मुख्य मार्गाने पालखी सोहळा गुरुराज माऊलीच्या गजरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली त्यावेळी महिला मंडळी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होते जागोजागी या पालखीचे स्वागत करण्यात आले व थोरला मठ येथे पालखीचे सांगता करून गुरुवर्यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ष ब्र . सांबा शिवाचार्य महाराज वसमत , ष .ब्र. १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (साखरखेडा ), ष . ब्र .करबसव शिवाचार्य महाराज वसमत , ष .ब्र. १०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव , ष .ब्र .१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज (पूर्णा ) , ष .ब्र . १०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज (पाथरी ) , ष .ब्र . १०८ सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज ( साखरखेडा ) ष .ब्र . १०८ सिवचैतन्य शिवाचार्य महाराज ( हादगाव ) , विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज ( आष्टी )यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी महिला भजनी मंडळ , महिला ग्रामीण भजनी मंडळ , भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे हा पुण्यतिथी पालखी सोहळा विविध उपकरणे साजरा करण्यात आला यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आले महा आरती, महापूजा ,प्रवचन ,भजन अशा विविध उपकरणाने साजरा करण्यात आला.

CLICK TO SHARE