जुनापाणी मध्ये राष्ट्रवादीची किस्मत चमकली

चुनाव

शालिकराम चव्हाण यांना सभापती संजय डांगोरे यांनी केले सन्मानित

प्रतिनीधी:राहील शेख काटोल

काटोल:काटोल पंचायत समितीमध्ये अंतर्गत येणाऱ्या जुनापाणी गट ग्रामपंचायत येथील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे किस्मत शालिकराम चव्हाण यांचा दणदणीत 180 मतापेक्षा जास्त मतांनी सरपंच पदाकरता निवडणूकीत विजय झालेलाआहे. काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी त्यांचा नुकताच सन्मान केलेला आहे. गट ग्रामपंचायत जुनापाणी मध्ये जामगड, अहमदनगर ,चिंचोली तथा जुनापाणी या चार गावा मिळून गट ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक हाती सत्ता प्राप्त झाली. यामध्ये किस्मत शालीक्राम चव्हाण सरपंच म्हणून निवडून आले तर सदस्य म्हणून विश्वनाथ शा. भोंगळे, प्रीती कैलास सूर्यवंशी , विकास व दुपारे , उत्तमराव गुलाबराव काळे, ज्योती मडावी ,सुनीता टोपले ,सुनिता कालभूत, निशा सोमकुवर ,रोशन परतेती आदी सदस्य म्हणून निवडून आले . 1776 मतदार असलेल्या या जुनापाणी ग्रामपंचायत मध्ये 1550 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला . किस्मतजी चव्हाण सरपंच म्हणुन निवडून येण्यासाठी त्यांनी अनेक वेळा आपल्या गावासाठी आणि परिसरासाठी समाजकार्य केले .गावामध्ये बस सुरू करण्यासाठी आंदोलन सुद्धा केले. आणि बस सुरू करून घेतली सुद्धा .तेच एसटी बस त्यांनी निवडणूक चिन्ह घेऊन सरपंच पदासाठी ते उमेदवार म्हणून उभे होते .त्यांचा सन्मान काटोल पंचायत समिती सभागृहामध्ये श्री संजयजी डांगोरे यांनी केला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य धम्मपालभाऊ खोब्रागडे, पंस.सदस्य अरुण उईके, वासुदेवरावजी बोरघाटे ,बालू माळोदे, प्रतीक राऊत, निखिल उकंडे, विक्रम गायकवाड ,रोहित देशभ्रतार आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी गृहमंत्री मा.अनिल देशमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सुद्धा किस्मत चव्हाण तथा इतर निवडुन आलेल्या सदस्यांचे अभिनंदन केले

CLICK TO SHARE