यशवंत विद्यालय अल्लीपुर येथे योगा दीन साजरा

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर्

जागतिक योगदिनाचे औचित्य साधून यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लिपूर् येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते योगा प्रशिक्षक यशवंत प्राथमिक शाळेच्या नांदुरकर मॅडम यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून जीवनात योग, प्राणायाम व व्यायाम याचे काय महत्त्व आहे हे सविस्तर विशद केले व विद्यार्थी शिक्षवृंद यांच्याकडून आसने व भ्रामरी, कपालभाती, अनुलोम विलोम,शीतली,आदि प्राणायाम करुन घेतले . यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता डोकणे मॅडम यांनी शरीर व मन स्वस्थ राहण्याकारिता रोज सकाळी योग, प्राणायाम व व्यायाम अवश्य करावा असे विध्यार्थ्यांना सांगितले यावेळी भोयर सर , झाडे सर, हाडके सर, सावदे सर , मेश्राम मॅडम, रामटेक सर, समर्थ सर, माटे मॅडम , अंड्रस्कर सर शिक्षकेत्तर कर्मचारी वैद्य, राऊत आणी विद्यार्थी उपस्थित होते

CLICK TO SHARE