खासदार अमर काळे यांना निवेदन

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

समुद्रपुर तालुक्यातील मांडगाव येथीलहनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व युवा संघ, भिकाराम महाराज सेवा मंडळ मांडगाव द्वारे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात खासदार अमर काळे यांना निवेदन देण्यात आले. मांडगाव येथे माजी खासदार रामदास तडस यांच्या निधी मधुन व्यायाम शाळेचे काम गेल्या तिन महिण्यापासुन सुरू आहे त्या कामामध्ये फारच दिरंगाई होत असुन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असुन योग्य ति सळाख वापरण्यात येत नसुन सिमेंट, रेती, व सिमेंटच्या विटा यामध्ये फारच निकृष्ट दर्जाच्या वापरण्यात येत आहे सदर काम चांगल्या प्रकार व्हावे या करीता निवेदन देण्यात आले आहे

CLICK TO SHARE