गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर 9373064093

कानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप माजी उपसभापती अमोल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. कानगाव विभागात मागील पाच वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे. या निमित्य आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळ वाटप करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्कूल बॅग, रजिस्टर, पेन, पेन्सिल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल गायकवाड, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट उपतालुका प्रमुख गोपाल मेघरे, याच्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

CLICK TO SHARE