तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
स्थानीक शेमाना रोड स्मशान भूमी जवळ ग्रामपंचायत कार्यालयात मार्फत कचरा संकलन केंद्र तयार केले आहेत. गावातील ओला व सुका कचरा घंटागाडीने संकलन केंद्रावर नेण्यात येत आहेत तो कचरा जाळण्याकरीता शेड सुध्दा बांधण्यात आले आहे .ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप मशीन न बसविल्यामुळे गावातील आलेला कचरा रस्त्यावर येऊन अस्ताव्यस्त पडलेला आहे. याला लागूनच अतिक्रमण धारक कुटुंब आपला परिवार घेऊन राहतात आणि आता पावसाळा सुरू झाला असून सदर कचरा गावाच्या दिशेने वाहत येऊ शकते त्यामुळे पुढील काही दिवसांत अतिक्रमण धारकांच्या कुटुंबाला आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल व दुर्गंधीचा सामना करावा लागेल त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने कचरा संकलन मशीन बसविण्यात यावी जेणे करून परिसरातील व जाण्या येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.