नुतन शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणाऱ्यांवर हिंगणघाट पोलीसांची कार्यवाही

क्राइम

प्रतिनिधी:अब्दुल कदीर बख्श हिंगणघाट

शहरातील नुतन शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणाऱ्यांची वाढती संख्यामुळे नागरीक त्रस्त झाले होते. अशावेळी नुतन शाळेतील मैदानात दारू व गांजा पिणारे बसणाऱ्या इसमांवर आळा घालण्यासाठी माहीती काढुन दिनांक 26 जुन 2024 रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन हिंगणघाट चे अधिकारी व कर्मचारी यांची 5 पथके नेमुण संपुर्ण मैदानाचा आराखडा तयार करून स्वतः पोनि श्री. प्रविण मुंडे यांनी पोस्टाफसह नुतन शाळेतील मैदानाला घेराव करून छापा मारला असता, सदर ठिकाणी गांजा व दारू पिणारे इसम त्यांच्या वाहनासह मिळुन आले. व त्याच्या सोबत इतर मैदानात बसनारे इसम सुद्धा मिळुन आले, त्यांना पोनि श्री. प्रविण मुंडे यांनी तोंडी समज दिली व गांजा, दारू पिणारे इसमां विरूद्ध पोस्टे ला कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही मध्ये कलम 85 (1) म.दा.का. अन्वये एकुण 3 व्यक्तीवर कार्यवाही करण्यात आली तसेच कलम 27 NDPS कायदयान्वये एकुण 2 व्यक्तीवर कार्यवाही करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रविण मुंडे, पोस्टे हिंगणघाट, सपोनि मिश्रा, पोउपनि शेख, जायभाये व पोलीस कर्मचारी सर्व पो.स्टे. हिंगणघाट यांनी केली.

CLICK TO SHARE