तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर
हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील अरुणराव गुलाबराव काचोळे, वय-55 वर्षे, रा- आजनसरा, हे दिनांक सात नोव्हेंबर रोजीचे रात्री 10.00 वा. शेत ओलीत करण्यासाठी शेतात जातो असे सांगुन घरातुन निघुन गेले होते परंतु ते घरी परत आले नाहीत. त्यांचा सर्वत्र तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ते कुठेही मिळुन आले नव्हते. घटनेचा अत्यंत बारकाईने पोलीसांकडून तपास करून खुनाचा उलगडा करून आरोपीस अटक करून त्यांच्या कडून खुनाचा गुन्हा कबूल करून घेतला आहे. पुढील तपास वडनेर पोलिस करीत असुन गुंतागुंतीचे प्रकरण उघडकीस आणले आहे.