आरपीएफ द्वारे रेल्वे गाडीतून मोबाईल चोरणाऱ्याला अटक

क्राइम

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्याला आरपीएफ ने अटक केली असून त्याच्या कडून ३० हजार रुपयाचा मोबाईल जप्त केले.२५ जुन ला न्यू दिल्ली हैद्राबाद १२७२४ तेलंगाना एक्स्प्रेस मधुन बी-३ कोच मधुन एक प्रवासी प्रवास करत होता. त्यांनी आपला मोबाईल चार्जिंग वर लावून बाथरूम मध्ये गेले. दोन मिनिटांनी येऊन बघितले तेव्हा त्यांना मोबाईल दिसला नाही. त्यांनी लगेच ड्यूटी वर असणारे आरपीएफ सहाय्यक उपनिरीक्षक रामलखन गुजर व हेड कॉन्स्टेबल हरीशकुमार मीना यांना सांगितले.आरपीएफ ने सीसीटीवी बघून चोराचा सुगावा घेतला. आरपीएफ निरीक्षक सुनीलकुमार पाठक यांनी आरपीएफ चे सहाय्यक उपनिरीक्षक मंगेश पायघन, शिपाही विलास मडावी व जीआरपी चे पोशी धीरज गावंडे यांचे पथक तयार करून तपास सुरू केले. रेल्वे स्टेशन जवळील हनुमान मंदिर परिसरात राहुल मोरेश्वर रामटेके रा. चोरगाव ता. चंद्रपूर याला विचारपूस करून त्याचा जवळून चोरी गेलेला मोबाईल किंमत ३० हजार रुपये हस्तगत केले. आरोपी राहुल रामटेके याला अटक करून पुढील कारवाई करीता जिआरपी पोलीसांना सुपूर्द केले. पुढील तपास जीआरपी चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कांबळे करीता आहे. सदर कारवाई मनोज कुमार वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आरपीएफ नागपूर, श्रीकुमार कुरूप ससुआ आरपीएफ नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ निरीक्षक सुनीलकुमार पाठक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

CLICK TO SHARE