मा. राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या निवासस्थानी युवासेना बैठक संपन्न

सोशल

प्रतिनिधी:दिनेश काटकर हिंगणघाट

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे महाराष्ट्र सचिव शुभम नवले यांचा विदर्भ दौरा खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या राहते घरी युवा सेनेची बैठक संपन्न झाली. युवकांचा राज्याच्या राजकारणात सहभाग सक्रिय व्हावा व नवीन नेतृत्व सामोर यावं याकरिता युवासेना संपूर्ण वर्धा जिल्हा तसेच विदर्भात युवाशक्तीची बांधणी करत आहे. यासंबंधी अशोक शिंदे यांनी पक्ष व संघटन बांधणी संदर्भात काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व दिशा निर्देशन दिले. या बैठकीला मार्गदर्शक म्हणून शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अशोक शिंदे, युवासेना महाराष्ट्र सचिव शुभम नवले व सहकारी यांच्या उपस्थिती सोबतच शिवसेना तालुकाप्रमुख अमित गावंडे तसेच युवासेना जिल्हाप्रमुख महेश मुडे, प्रशांत लहामगे,देवा शेंडे,अमित काळे,विक्की राऊत ई. मंडळी उपस्थित होते.

CLICK TO SHARE