मनविसे ने राज्य शाशन दरबारी केली खालील मागणी

एज्युकेशन

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

१)स्वायत्ता महाविद्यालयाचा बुरखा पांघरून अनुदानित महाविद्यालये विनाअनुदानित करण्याच्या मनमानी कारभारावर के. व्ही.पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांवर कारवाई होण्याबाबत.२).सरकारी कामात दिरंगाई करणे व तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र व अधिनियमाचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या पनवेल विभागाच्या सह-संचालकावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याबाबत.३).पेंढारकर महाविद्यालयातील संस्थाचालकांनी १२ सप्टेंबर २०२३ रोजी सहसंचालक पनवेल विभाग यांना पाठवलेल्या प्रस्तावाला सह-संचालक यांनी तात्काळ नामंजूरी पत्राद्वारे का कळवली नाही. त्यांच्या ह्या हलगर्जी व निष्काळजीपणाबाबत त्यांच्यावर दफ्तर दिरंगाई ची कारवाई करण्यात यावी.४).शासनाच्या तिजोरीतून शिक्षकांना वेतन दिले जात असताना देखील शिक्षकांना एका खोलीत कोंडणारे पेंढारकर महाविद्यालयाच्या संस्थाचालक व सह-संचालक पनवेल विभाग ह्यांच्याकडून शिक्षकांचा पगार वसूल करावे.५).सह-संचालक पनवेल विभाग यांच्या डोळ्यादेखत पेंढारकर महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने केलेल्या मनमानी कारभारावर सह-संचालकाने कुठल्याच प्रकारची कारवाई न करणे म्हणजे पेंढारकर महाविद्यालयाच्या कारनाम्यामध्ये छुपी समत्ती व हात मिळवणी आहे असे दिसून येते, त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ ऑगस्ट २९, २०१३ कलम १० नुसार घटनात्मक कारवाई करण्यात यावी व ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी.६) डोंबिवली येथील के व्ही पेंढारकर महाविद्यालयाचा स्वायत्ता दर्जा रद्द करावा.अशी मागणी मुंबई मनविसे यांच्या तर्फे करण्यात आली आहे

CLICK TO SHARE