चिकणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

हेल्थ

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण, वरोरा

महाराष्ट्र:वरोरा हेल्पएज इंडिया वरोरा, एम एच यू अंतर्गत आज दिनांक 29 जुन ला चिकणी या गावात 50 वर्ष वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिरात बीपी ,शुगर ,ताप , सर्दी,खोकला, अस्थमा अशा प्राथमिक आरोग्याची तपासणी करून मोफत औषध देण्यात आली.या शिबिराचे नियोजन सामजिक संरक्षण अधिकारी राशेदा शेख यांनी मा. नामदेव ढेंगडे चिकणी सरपंच यांच्या सहकार्याने केले. शिबिरात मेडिकल ऑफिसर डॉ. राजरतन मून यांनी ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून वैभव देठे यांनी औषध वितरीत केले.या शिबिरात चिकणी मेडिकल ऑफिसर डॉ. रोहन धोंगडे , आरोग्य सेविका एन टी महेशकर , जयश्री रामटेके , संप्रस जागडेकर आरोग्यसेवक , नामदेव देवतळे लॅब टेकनिकशियन तसेच ,योग प्रशिशिका सौ. शीतल मितकर , माधवी मोटके सामजिक कार्यकर्त्या, संदिप काळे यांनी शिबिर यशस्वी होण्याकरिता सहकार्य केले. या शिबिराचा लाभ गावातील 120 ज्येष्ठ नागरिकांना घेतला.

CLICK TO SHARE