डोक्यावर लोखंडी वस्तू मारून केले जखमी

क्राइम

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

अल्लिपुर पोलीस स्टेशन च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तळेगाव (टा, ) येथिल गजानन मारुती ठाकरे याने पत्नीच्या चारित्र्याच्या वर संशय घेऊन पत्नीला दिवाळीच्या ऐन तोंडावर लोखंडी शस्त्राने डोक्यावर व तोंडावर मारून गंभीर जखमी केले. या बाबद अल्लीपूर पोलीस स्टेशनला तळेगाव टालाटूले येथील अशोक मानकर शेती मालक यांनी तक्रार नोंदवली असून घटनास्थळी अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल डाहूले, जमादार प्रकाश महीन, पोलीस शिपाई, सतीश हांडे, निलेश लोगुरवार, रोहीत साठे, प्रफूल चंदनखेडे, यांनी जाऊन आरोपी याला अटक केली आहे. पुढील तपास अल्लीपुर पोलिस करीत आहे.

CLICK TO SHARE