मोकाट कुत्र्यांचा तिन शाळकरी मुलांवर हल्ला

हेल्थ

जखमीं मुलांवर नांदेडला उपचार,नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत वसमत शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून दिसेल त्याला चावा घेत आहे रविवारी कुत्र्यांनी तीन शाळकरी मुलांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याने त्यांना नांदेड येथे उपचार घ्यावे लागले कुत्र्यांमुळे शहरात दहशत पसरली असतानाही नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहेया बाबत अधिक माहिती अशी की वसमत शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा कळप फिरत असून त्यांचा कुठलाही बंदोबस्त न.प. कडून करण्यात आला नसल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कुत्रे लहान मुले,नागरिक, महिलांच्या पाठीमागे लागत असून अंगावर येत आहेत, त्यामुळे लहान मुले, शाळेत जाणारी मुले यांना शाळेत जाण्यास भिती वाटत असून शाळा घरापासून थोड्या अंतरावर असताना देखील पालकांना मुलांच्या सोबत शाळेत यावे लागत आहे. दि.30 जुन रोजी दुपारच्या वेळी कौठा रोड पोस्ट कॉलनीमधील खुशी नामदेव श्रवणे (वय 8 वर्षे) तसेच अब्दुल रहेमान शेख मुश्ताक (वय 07 वर्ष) वाहेद कॉलनी खान फक्शन हॉलच्या बाजूस,मोहम्मद चाऊस मसुद चाऊस (वय 4 वर्ष) गढी मोहल्ला वसमत येथे राहत असलेल्या परिसरात घरासमोर खेळत असता रस्त्यावरील मोकाट कुत्र्यानी सदर लहान मुलांवर हल्ला करुन त्यांचा चावा घेतला व गंभीररित्या जखमी केले वरील परिसरातून मुलाना सरकारी दवाखान्यात आणण्यात आले परंतु तिथे त्यांच्यावर काहीही उपचार झाले नाहीत, त्या मुलांना नांदेड येथील दवाखान्यात उपचार घ्यावे लागले आहेत. हे मोकाट कुत्रे या लहान मुलांना फाडून खातील अशी परिस्थिती त्यावेळी नागरीकाच्या नजरेस पडली व त्यांनी कुत्र्यांना हाकलत असता कुत्रे त्यांच्या अंगावर चावा घेण्यासाठी धावून येत होते. जर त्यावेळी कुणी आले नसते तर या मोकाट कुत्र्यांनी तिनही लहान मुलांचा फाडून जीवे घेतला असता, वसमत शहरात प्रत्येक चौकात, गल्लो-गल्ली, शाळेजवळ,मोकाट कुत्र्यांचे झुंड दिसत असून ही कुत्रे जाणाऱ्या- येणाऱ्या लोकांना भुकंतात, त्यांच्या मागे लागतात,वाहनाच्या मागे लागतात त्यामुळे वाहनांचे देखील अपघात होत आहे व रहदारीस अडथळा व त्रास होत आहे. तसेच सदर मोकाट कुत्रे है संसर्ग झालेलेअसून त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आहे नागरिकांच्या सतत तक्रारी असतानाही नगरपरिषदेकडून या कडे का ? दुर्लक्ष केले जाते हे उलगडणारे कोडे आहेत्या मुळे वसमत शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा तसे न केल्यास भविष्यात अशा घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेची राहील याची नोंद घेण्याची मागणी पीडित बालकांच्या पालकां कडून सोमवारी दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहेनिवेदनावर काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष नदीम सौदागर,शेख चाँदपाशा मदार,सईदबिन अहमद चाऊस आदीसह नागरीकांच्या स्वाक्ष-या आहेत

CLICK TO SHARE