नरखेड तालुक्यातील मोहदी(दळवी)गट ग्रामपंचायतीचे मतदान जोरात

चुनाव

भाजप,राष्ट्रवादी समर्थित पॅनल चा धुव्वा,धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चा विजय

प्रतिनिधी:रितेश कान्होलकर नरखेड

नरखेड:नरखेड तालुक्यातील मोहदी ( दळवी) गट ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2023 मधे भाजप समर्थीत माजी सरपंच रमेशबाबू दळवी यांचे ‘युवाशक्ती परिवर्तन पॅनल’ व राष्ट्रवादी समर्थीत माजी उपसभापती वैभव दळवी व माजी सरपंच रुपरावजी निसाळ यांच्या ‘ग्रामविकास पॅनल’ च्या विरोधात तिसरे सामान्य जनतेचे पॅनल ‘ग्रामपरिवर्तन पॅनल’ या स्वतंत्र पॅनल चे राहूल साहेबराव दळवी यांची 529 मते घेउन 170 अशा सर्वाधिक मताधिक्याने सरपंच पदी विजयी झाले तसेच 9 सदस्यापैकी 5 सदस्य विजयी होउन ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ असा विजय प्राप्त करून ‘ ग्राम परिवर्तन पैनल’ ची स्पष्ट बहुमताने एकहाती सत्ता प्राप्त झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी समर्थित माजी उपसभापती वैभव दळवी व माजी सरपंच रूपरावजी निसाळ यांचे ‘ग्राम विकास पॅनल’ चे 4 सदस्य विजयी झाले परंतु सरपंच पदाचे उमेदवार अमित निसाळ 361 मते घेऊन पराभूत झाले. भाजप समर्थित माजी सरपंच रमेशबाबू दळवी यांच्या ‘युथ परिवर्तन पॅनल’ ला एकही जागा मिळाली नाही व सरपंच पदाचे उमेदवार सारंग दळवी हे 306 मते घेउन पराभूत झाले. या विजयाचे श्रेय्य मोहदी (दळवी), सारडि, हेटी, रामनगर येथील सर्व ग्रामस्थांना जाते असे नवनिर्वाचित सरपंच राहुल दळवी यांनी सांगितले त्यामुळे गावातील जनतेमध्ये अती उत्साह दिसून येत आहे .

CLICK TO SHARE