यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लिपुर येथे स्वागत सोहळा

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

स्थानीक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,अल्लिपुर येथे सत्र:२०२४/ २०२५. शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव नवगतांचे स्वागत सोहळा पार पाडण्यात आला यावेळी नवगत विद्यार्थ्यांना व पाहुण्यांना बँड पथकाच्या मधुर ध्वनीने स्वागत करण्यात आले, शाळेच्या प्राचार्य : सन्माननीय सौ. स्मिता ढोकणे मॅडम होत्या प्रमुख अतिथी: सन्माननीय अशोक भाऊ सुपारे (माझी पंचायत समिती सदस्य) सन्माननीय श्री. विजय भाऊ जयस्वाल (समाज कार्यकर्ते) श्री. डाहुर्ले (ठाणेदार पोलीस स्टेशन अल्लीपूर्) माननीय श्री. परेश सावरकर (माजी विद्यार्थी) ज्येष्ठ शिक्षक शिक्षक प्रतिनिधी: श्री भोयर सर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे व यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष स्वर्गीय बापूरावजी देशमुख यांच्या च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्वतच मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकसंच व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणातून सन्माननीय सौ ढोकणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.फलक लेखन श्री .एस. पी. सावदे सर (कलाशिक्षक) यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन सन्माननीय कुमारी. रूपा कडू मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन सन्माननीय श्री.झाडे सर यांनी केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता. विद्यार्थ्यांना मिष्ठांन चा आस्वाद देऊन करण्यात आली.

CLICK TO SHARE