प्रतिनिधि:रवी वाहणे शेदूर्जनाघाट
वरुड तालुक्यातील कुरळी येथे बिरसा क्रांती दलाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक पार पडली. कुरळी शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून हरिदास युवनाते यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. व महिला फोरम शाखाध्यक्ष म्हणुन सुनिता परतेती यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला प्रा. कमलनारायण उईके यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. यावेळी बिरसा क्रांती दलाचे वरुड तालुकाध्यक्ष मनोज उईके, तालुका कोषाध्यक्ष नितेश उईके, वरुड तालुका संपर्कप्रमुख विनोद धुर्वे, तालुका मीडिया प्रमुख अजय कवडे, रोशनखेडा शाखेचे सदस्य श्याम धुर्वे, रामदास युवनाते कुरळी या गावातून हरिदास युवनाते, देविदास युवनाते, दिलीप उईके, मंगेश उईके, देवकु धुर्वे, सुषमा धुर्वे, संगीता उईके, ललिता सलामे, अर्चना मनोटे, रमा धुर्वे, नीता उईके, रुक्मणी युवनाते, रूपाली परतेती, पार्वती उईके, शांता युवनाते, सुखवंती परतेती, फुलबती कवडेती, अनिल युवनाते, रामकिसन धुर्वे, रुपेश सर्याम, सुजन परतेती, राजेश नवडेती, पांडुरंग मरसकोल्हे, सुरेश उईके, शिवदास परतेती, जयकुमार परतेती, सौम्या धुर्वे, श्रुती सर्याम, गणपत उईके, गौरव धुर्वे, वैभवी सर्याम, दयाराम उईके, गणपत परतेती, शिवराम धुर्वे व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.