शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : येथील सास्ती पुलियाजवळ आज सकाळी वेकोलि कामगार सचिन अशोक पत्तीवार (४५), रा. तुकुम चंद्रपूर हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३४ एवाय ०३४९ वरून दररोज ये-जा करत असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहितीनुसार, वेकोलिच्या सास्ती, गौरी, पवनी खाणीतून बल्लारपूर रेल्वे साईडिंगपर्यंत अवजड वाहनांद्वारे कोळशाची वाहतूक होत असल्याचे सांगण्यात आले. चोवीस तास वाहनांची ये-जा सुरू असल्याने पुलावर मोठ मोठे खड्डे पडले असून दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून पुल ओलांडावे लागत आहे. येथून दररोज हजारो लोक ये-जा करतात.पुलाचे जेव्हा पर्यंत दुरुस्ती चे काम सुरू होईल पर्यंत लोकांनी मूर्तदेह उचलण्यास विरोध सुरू केला होता. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवुन मूर्तदेह रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. तर सर्वाधिक अपघात पुलावर होत असते. तिथे मोठे खड्डे असुन दुरुस्तीची जबाबदारी एका विशेष कंत्राटदाराला दिली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अपघाताचे पुढील तपास बल्लारपूर पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रेमशाहा सोयाम, पोशी कैलास आदे करीत आहे.