माजी.खा.दत्ताजी मेघे यांच्या उपस्थितीत गडकरी यांना साकडे
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाचा ‘क’ दर्जा व केंद्रीय पर्यटन प्रसाद योजनेत समावेश झालेल्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांच्या तीर्थक्षेत्र धार्मिक पर्यटन विकास निधी भक्तगण सोई सुविधा विकास आराखडा मंजूर करुन 300 कोटी च्या प्रस्तावास मंजुरी देण्याबाबतदेवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले, जेष्ठ नेते माजी खा.दत्ताजी मेघे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीत विजय व मंत्री झाल्या बद्दल माजी आ. सागर मेघे, आ. समीर मेघे यांचे कडून सत्कार करण्यात आला तसेच आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान च्या वतीने अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांच्या कडून पुष्पगुच्छ व भोजाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला,तसेच केंद्रीय निधी अंतर्गत वडनेर ते आजनसरा हा 24 कोटी रुपये खर्चाचा सिमेंट रोड करुन दिल्या बद्दल आभार व्यक्त करण्यात आले, अध्यक्ष डॉ.पर्बत यांचा सततचा पाठपुरावा, व माजी खा. रामदास तडस, आ. समिर कुणावार वि.प. आ. डॉ.रामदास आंबटकर यांच्या अथक प्रयत्नातून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भोजाजी महाराज देवस्थाचा केंद्रीय पर्यटन प्रसाद योजनेत समावेश करण्यात केला , त्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 2022 च्या हिवाळी अधिवेशनात केली होती,त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडून सम्पूर्ण विकास आराखडा तयार करण्यासाठी निर्देशीत करण्यात आले आहे,त्यानुसार 300 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करुन पर्यटन विकास निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,यावेळी माजी खासदार दत्ताजी मेघे,मा.आ. सागर मेघे आ.समिर मेघे,जेष्ठ नागरिक सेवा संस्थानाचे सचिव राजू मिश्रा, डॉ. विजय पर्बत,डॉ.राजू मिश्रा,ऍड प्रकाश मेघे, डॉ. संजय उगेमुगे, मोहन पांडे,सत्यनारायण राठी,मिलिंद वाचणेकर,श्रीधर नहाते,अंगतसिंग सोळंकी,सुरेश उरकुडे, डॉ. मंगला गावंडे,डॉ. राखी खेडीकर, ऍड. उषा पांडे यांची उपस्थिती होती.